सावंतवाडी शहरात ३० रोजी शिवतेज मिञमंडळातर्फे खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवतेज मिञमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ठिक ९ वाजता मोती तलावाच्या काठावर श्री.राम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत भव्य दिव्य अश्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना व तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धकांनी आपले नरकासुर ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्पर्धा स्थळी राञी ठिक ९ ते ११ या वेळेतचं आणायचे आहेत. राञी ११ नंतर आलेल्या स्पर्धेकांचा स्पर्धेमध्ये समावेश केला जाणार नाही असे शिवतेज मिञमंडळाकडून सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page