बोट दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरी अर्चना घारेंनी भेट देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन…!

शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन…

⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महीला कोकण अध्यक्षा अर्चना घारे यांनी निवती समुद्र किनारी बोट पलटी होऊन दुर्घटनेत मृत झालेल्या आनंद पराडकर श्रीरामवाडी व भाऊ येरागी खवणे यांच्या घरी अर्चाना घारे यांनी भेट घेऊन कुटुंबियांची सांत्वन केल.

तसेच सौ.घारे यांनी निवती समुद्र किनारी ज्यांची बोट पलटी ते बोट मालक श्री. आनंद धुरी यांच्या घरी जाऊन दुर्घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली व शासन स्तरावर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी निवती सरपंच श्री. अवधूत रेगे , पोलीस पाटील जोगेश सारंग , गोविंद जाधव , परेश सारंग , रामा भगत , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष श्री. योगेश कुबल, सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

You cannot copy content of this page