आमदार नितेश राणेंनी घेतले जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली च्या दुर्गामातेचे दर्शन…!

⚡कणकवली ता.०८-: सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी जय भवानी गोंधळी समाज संघ कणकवली च्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात येते. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आज जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवलीच्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी जयभवानी गोंधळी समाज अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे उपाध्यक्ष शिवाजी भिसे यांच्याहस्ते आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, जयभवानी गोंधळी समाज अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे, उपाध्यक्ष शिवाजी भिसे, माजी अध्यक्ष विजय इंगळे, मंजुनाथ भिसे, भिमराव इंगळे, जीत भिसे, कृष्णा इंगळे, राम शिंदे, दिपक भिसे, शंकर वाघमारे, सौरभ इंगळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page