दिवाळीत मळगाव येथे शिवकालीन मर्दानी खेळांचे सात दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर…!

⚡सावंतवाडी ता.०५-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ आयोजित “सह्याद्री संस्‍कार शिबीर २०२४” चे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे शिवकालीन मर्दानी खेळ प्रक्षिक्षण शिबिर ८ ते १८ या वयोगटातील विद्यार्थी – विद्यार्थांनींसाठी आहे. सोमवार दि. ४ नोव्हेंबर ते रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ या सात दिवसांच्या कालावधीत असणार आहे. या शिबीरात लाठी काठी, ढाल तलवार, भालाफेक, दांडपट्टा या मर्दानी खेळांचा समावेश आहे. या खेळांचे प्रक्षिक्षण देण्यासाठी राष्ट्रवीर संघ पुणे चे श्री. रवींद्र गव्हाणे येणार आहेत.
हे प्रशिक्षण पुर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहे.
या मोफत प्रशिक्षण सुवर्णसंधीचा लाभ पहिल्‍या दिवसापासून शेवटच्‍या दिवसापर्यंत सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आयोजकांनी केले आहे.

या शिबीरात सहभागी होऊ इच्‍छिणार्‍याचे किमान वय १० वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मळगाव गावाच्या परिसरातील (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) मुला व मुलींना प्राधान्याने सहभागी करून घेतले जाईल. सदर प्रशिक्षण शिबीराचा तपशिलवार कार्यक्रम लवकरच घो‍षित करण्‍यात येईल.

शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्याथिर्नीसाठी दि. ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या काळात आयोजित ७ दिवसीय “शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण” शिबीरात भाग घेण्‍यास इच्छूक असणार्‍यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा असे आवाहन करण्यात आले !

ऑनलाईन फाॅर्म लिंक :-
https://docs.google.com/forms/d/1ouLXZ9hW9Ml03IA2r_5eLTWBYh5VgMwScJhfb8Bl6cs/viewform

अधिक माहितीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा…

सुनिल राऊळ – ९६३७८२६३१५
प्रमोद मगर – ८६९८३८७१३८
रितेश राऊळ – ८७८८८७६१७३
एकनाथ गुरव – ९०११४८६८८१

You cannot copy content of this page