युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०४-: राजेसाहेब खेमसावंत भोसले, राजवाडा, श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदीर ट्रस्ट, दाणोली व के.एल.ई. हॉस्पीटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे उद्या महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे महाआरोग्य शिबीर उद्या शनिवार दिनांक ०५/१०/२०२४ रोजी
सकाळी ०९.३० ते दु. ०३.०० वाजेपर्यंत असणार आहे,
तरी या शिबिरामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी लोकांना केले आहे.
