सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन…!

नवरात्रउत्सवाचे निमित्त:स्पर्धेत जास्तीत जास्त महिला- मुलींनी सहभाग घेण्याच केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०२-: नवरात्र उत्सवानिमित्त सावंतवाडी शहर शिंदे शिवसेना महिला आघाडी तर्फे 4 ऑक्टोंबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे वैश्य भवन हॉल येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत या स्पर्धा घेण्यात येणार आहे.


या स्पर्धेत दांडिया महिला, दांडिया मुली, गरबा महिला, गरबा मुली, वेशभूषा महिला, वेशभूषा मुली, जोडी महिला, जोडी मुली अशा स्पर्धा होणार आहे विजेत्यांना आकर्षित असेही ठेवण्यात आले आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला मुलींनी सहभाग दर्शवावा असे आवाहन शहर महिला आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page