बांद्यात ५ व ६ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या दांडिया स्पर्धेचे आयोजन…!

बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ तर्फे आयोजन: स्पर्धकांनी संघांची नावनोंदणी करण्याचे केले आवाहन..

⚡बांदा ता.२८-: सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने ५ व ६ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा श्री स्वामी समर्थ सॉ मिलचे आनंद गवस यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या दांडिया संघाना अनुक्रमे १०००१, ५००१, २५०१ रुपयांचे पारितोषिक तसेच उत्तेजनार्थ संघाला १००१ रुपयांचे पारितोषिक व स्पर्धेतील हिट जोडीला १००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धक संघांनी नावानोंदणीसाठी ओंकार नाडकर्णी (मो. ९०७५८५७५५८) किंवा सिद्धेश शिरोडकर (मो. ९९६०३९३७१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page