वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी कार्यशाळेतून मार्गदर्शन…

⚡मालवण ता.२२-: केंद्र सरकारच्या निर्देशखाली काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’, गोवा आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ, ड्रग्ज अशा नशा विरोधी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘आम्ही नशा करणार नाही’ अशी शपथ घेतली.

या कार्यशाळेत वराडकर हायस्कुल आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ व ड्रग्जच्या दुष्परिणामाबद्दल माहिती देऊन या विरोधात कसे लढायचे यांचे विशेष मार्गदर्शन सिनियर इन्स्पेक्टर श्री.मंगेश पेडणेकर आणि सबइन्स्पेक्टर पडते आणि त्यांच्या टीमने केले. तसेच मुलांना स्लाईड शो द्वारेही माहिती देण्यात आली. तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरीच्या संधी बाबतही माहिती देण्यात आली.

यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या वतीने अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते या टीमला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टा च्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. ऋषिकेश नाईक, डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आर. जी. गावडे, सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षिका प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page