देवगड: प्रतिनिधी
देवगड येथील पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी निलेश जगताप यांची नुकतीच राजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आल्याचे पत्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे.
श्री जगताप यांनी आपल्या वीस वर्षांच्या सेवेतील तेरा वर्षे देवगड तालुक्यात प्रभावीपणे सेवा बजावलेली आहे. या काळात महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीॅमार्फत तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवणे अशी विविध विधायक व लोकाभिमुख कार्ये करून त्यांनी देवगड तालुक्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत बापर्डे येथील ग्रामपंचायत शाश्वत विकास संकल्पना ५. या स्पर्धेत स्वच्छ आणि हरित गाव म्हणून प्रथम मानांकन मिळवून राज्यात प्रथम आली होती. या पुरस्कारासाठी जगताप यांचे बहुमोल मार्गदर्शन ग्रामपंचायतीला त्यांना प्राप्त झालेले होते.अशा या मनमिळावू व लोकांच्या मदतीस सदैव तत्पर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी पदी बढती मिळाल्याबाबत त्यांचे संपूर्ण देवगड तालुक्यातून अभिनंदन करून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.
