नाडण मधील उबाठाचे बूथ प्रमुख नितीन बाईत यांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश…

⚡देवगड ता.२१-: देवगड नाडण मधील बाईत वाडी येथील उबाठाचे बूथ प्रमुख नितीन बाईत यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासमवेत अनेक उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.

नाडण येथील विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागतील असा विश्वास प्रवेश करताना व्यक्त केला. नितीन बाईत व सहकार्यानी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता नाडण बाईतवाडी ही शतप्रतिशत भाजपामय झाली आहे.
यावेळी नितीन बाईत यांच्याबरोबर संतोष बाईत, विवेक बाईत, अक्षय बाईत, साहिल बाईत, प्राची बाईत, तेजस बाईत, यांच्यासह शेकडो ग्रामस्थ महिलांनी प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, संजय बोंबडी, स्थानिक कार्यकर्ते सतीश घाटे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, प्रभारी संतोष किंजवडेकर, अनिल पुरळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page