वायंगणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी संतोष साळगांवकर बिनविरोध…!

वेंगुर्ला प्रतिनिधी – वायंगणी गावच्या तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष साळगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  नुकत्याच झालेल्या वायंगणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीची निवड करण्यात आली. या समितीमध्ये सरपंच दत्ताराम दुतोंडकर, आनंद दाभोलकर, समीर मुणनकर, श्रीधर पंडित, नारायण पेडणेकर, विद्या गोवेकर, ओंकार म्हारव, महेंद्र सातार्डेकर, पुरूषोत्तम कोचरेकर, सुमन कामत यांच्यासह पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, वीज कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. नूतन अध्यक्ष संतोष साळगांवकर यांचे ग्रामसभेतील उपस्थित ग्रामस्थांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो – संतोष साळगांवकर

You cannot copy content of this page