बांदा/प्रतिनिधी
नेतर्डे-खैराटवाडी येथे शेजारच्या घरी गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा फिट आल्याने सार्वजनिक विहिरीत पडून मृत्यू झाला. अनिल मधुकर गवस (३६, रा. नेतर्डे-खैराटवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सुनील मधुकर गवस यांनी बांदा पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेतर्डे-खैराटवाडी येथील तरुण अनिल मधुकर गवस याला दहा वर्षाचा असल्यापासून अधुनमधून फिट येण्याची सवय होती. सोमवारी सायंकाळी तो गावातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तो खैराटवाडी येथील सार्वजनिक विहिरीकडे आला असता त्याला फिट आल्याने त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. तेथील स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची माहिती त्याचे बंधू सुनील गवस यांनी बांदा पोलिसांत दिली.
बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस कॉन्स्टेबल डी. बी. पालकर करत आहेत.
गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा फिट येवून विहिरीत कोसळल्याने मृत्यू…
