⚡सावंतवाडी ता.१८-: मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी अँड. राजू कासकर यांची तर सावंतवाडी तालुका सचिव पदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहॆ. या बाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली. दरम्यान या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे नेते संदीपदादा दळवी, व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहॆ.
लवकरच पक्षाची उर्वरीत कार्यकारणी जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहॆ.
आता पर्यंत ॲंड. राजू कासकर यांनी पक्षासाठी अनेक पदावर काम केले आहे, प्रत्येक पद भूषवताना योग्य न्याय दिला आहे. श्री.कासकर हे मनसेप्रणीत एस .टी कामगार सेना जिल्हाध्यक्ष म्हणुन सध्या कार्यरत आहेत. तसेच स्वराज्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणुन कार्यरत ही आहेतं. मनसे पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष प्रमुख राज ठाकरे साहेब यांच्या सोबत आतापर्यंत अनेक त्यांनी भूषविली आहेतं…
सावंतवाडी तालुका प्रमुख म्हणुन काम करत असताना पक्ष वाढीसाठी मोठं योगदान आहे. राजकीय अनुभव प्रदीर्घ असल्यामुळं ॲड. श्री.कासकर यांना ही मोठीं जबाबदारी देण्यात आली. आता पर्यंत अनेक समाज हितउपयोगी कार्य श्री.कासकर यांच्या हातून घडली. पक्ष वाढीसाठी ही मोठं योगदान दिलं आहे राजकारणाचां दांडगा अनुभव, कुशल वक्तव्य यामुळं पक्ष संघटना वाढविण्याच्या हेतूने श्री. राजू कासकर यांना या पदाची मोठीं जबाबदारी देण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच मित्रपरिवारांकडून ॲड.राजू कासकर यांनां पुढील वाटचालीस भरभरून शुभेछा देण्यात येत आहे. यावेळी राजू कासकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. पक्ष संघटना ,कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि तरुण उमेदी कार्यकर्त्यांना एकत्रित घेवून पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करू, व शहरात पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देऊ असेही श्री.कासकर यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे.
