डेगवे येथील माध्यमिक विद्यालय प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन…

⚡बांदा ता.२७-: डेगवे येथील माध्यमिक विद्यालय प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी डेगवे सरपंच राजन देसाई, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, डेगवे सोसायटीचे चेअरमन व शालेय समिती सदस्य प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, शालेय समिती सदस्य अभय देसाई, भरत देसाई, प्रदीप देसाई, श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कामत यांचा मुख्याध्यापक श्री सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री स्थापेश्वर देवस्थान कमिटी तसेच सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्यामार्फत 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील व होतकरू विद्यार्थ्यांना देवस्थान कमिटी मार्फत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्रेमानंद देसाई यांनी प्रशालेला पाच हजार रुपये किमतीच्या प्रयोगशाळेतील मायक्रोस्कोप तसेच इतर साहित्य भेट स्वरूपात दिले. प्रमोद कामत यांनी संगणक कक्षाला आर्थिक स्वरूपात मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस के सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यशदा देसाई यांनी केले. आभार श्री मगदूम यांनी मानले.
फोटो :-
डेगवे प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन करताना प्रमोद कामत. सोबत इतर मान्यवर.

You cannot copy content of this page