चोकुळ वासियांची मागणी: मंत्री केसरकर गावकऱ्यांची दिशाभूल करत आहेत…
सावंतवाडी ता.२६-: चौकुळ कबुलायतदार गावकर जमीनीवर 1999 मध्ये लागलेली महाराष्ट्र शासन ही नोंद सरकारने शुद्धिपत्रक काढून मागे घ्यावी व जमीन पुनश्चा कमलायतदार गावकर यांच्या नावे करावी ची मागणी पुन्हा एकदा चौकुळ कबुलायतदार गावकर यांनी आज येथे केली.
तर कबुलायदर गावकर जमीन प्रश्नी मंत्री केसरकर हे गावकर्याची दिशाभूल करत आहेत ते चौकूळ हे आपले दुसरे घर असल्याचे सांगतात मग त्यांनी घरात वाद लावू नये असेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहावर चौकुळ कबुलायदर गावकर कृती समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष एडवोकेट राजाराम गावडे राजेंद्र गावडे, बाळकृष्ण गावडे, सोमनाथ गावडे, लक्ष्मण गावडे, अभिषेक गावडे, भरत गावडे, सोनाराम गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
