नऊ प्रवासी किरकोळ जखमी: वाहनाला बाजू देताना घडला अपघात..
वैभववाडी प्रतिनिधी
समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देताना कुसुर पिंपळवाडी येथे विजापूर कुडाळ गाडी ओहळात पलटी होऊन नऊ जण किरकोळ जखमी झाले जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजापूर कुडाळ बस कोल्हापूर गगनबावडा भुईबावडा घाटमार्ग वैभववाडी वरुन कुडाळ कडे जाणारी एसटी बस कुसुर पिंपळवाडी दरम्यान आली असता समोरून येणाऱ्या गाडीला बाजू देताना गाडी साईट पट्टी उतरून साईट पट्टी खचल्याने गाडी ओहळात पलटी होऊन अपघात झाला यामधून 32 प्रवासी प्रवास करत होते गाडीची मागील काच फोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींमध्ये रेणुका परशुराम मिलिंदमणे 50 राहणार कणकवली सुनीता विजय शिंदनिगर 42 सुरेश नारायण गंगावणे वय 72 दिव्या रोहिदास मिस्त्री वय वर्ष 25 राहणार कुडाळ बंडू रेडू राठोड वय वर्ष 41 रेणुका बंडू राठोड वय वर्ष 37 चिंचू बंडू राठोड वय वर्षे 17 सर्व राहणार विजापूर सिद्धेश सुरेश करगोटे वय वर्ष २४ राहणार वैभववाडी समृद्धी सुनील रावराणे वय वर्षी 21 राहणारी एडगाव वैभववाडी असे नऊ जण किरकोळ जखमी होऊन त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार करून घरी सोडण्यात आले.
