मोफत नेत्र तपासणी शिबिराचा दीडशे जणांना लाभ…

⚡वेंगुर्ला ता.२६-: विश्व हिदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला-भटवाडी येथील रवी शिरसाट यांच्या निवासस्थानी २५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा सुमारे दीडशे जणांनी लाभ घेतला. उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


या शिबिरात मुंबईतील नेत्रतज्ज्ञ डॉ.निरव रायचुरा व डॉ. दृष्टी रायचुरा यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली. तर यातील अत्यावश्यक अशा रूग्णांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक डॉ.राजन शिरसाट यांनी दिली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वि.हि.प.चे जिल्हा सेवा प्रमुख नंदकुमार आरोलकर, नितीन पटेल, डॉ.माधुरी शिरसाट, भाजपा वैद्यकिय आघाडीचे डॉ.दर्शेश पेठे, सुनिल नांदोस्कर, किरात मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुनिल मराठे, शुभांगी ऑप्टीक्सचे निलेश हरमलकर व सचिन हरमलकर, रवी शिरसाट आदी उपस्थित होते. तर माजी नगरसेवक प्रशांत आपटे, वि.हि.प.चे गिरीश फाटक, शिरसाट मिठाईचे बाळा शिरसाट, गो-सेवा आयोगाचे दिपक भगत, किर्तीमंगल भगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नित्यानंद आठलेकर, विशाल सावळ, उद्योजक दिपक माडकर, शिवदत्त सावंत आदींनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पारकर यांनी तर आभार डॉ.राजन शिरसाट यांनी मानले.

You cannot copy content of this page