बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून सावंतवाडीत महाविकास आघाडीकडून निषेध…

⚡सावंतवाडी ता.२४-:*  बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडी कडून सावंतवाडीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शिवसेना शाखा येथे तोंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बाळा गावडे तालुका संघटक मायकल डिसूजा महिला आघाडी प्रमुख भारती कासार उप तालुकाप्रमुख आबा सावंत विभाग प्रमुख सुनील गावडे महिला आघाडी शहर संघटन संघटक श्रुतिका दळवी कल्पना शिंदे विनोद ठाकूर बाळू गवस अशोक धुरी आदी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाला देताच महाविकास आघाडीने शनिवारी बदलापूर मधील बालिकांवर झालेल्या अमानुष अत्याचार विरोधात पुकारलेला बंद मागे घेतला मात्र शिवसेनेसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर चौका चौकात तोंड बांधून निदर्शने केली.


बदलापूर मध्ये दोन चिमूरड्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती अन्य काही समविचारी पक्षाने देखील महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा जाहीर केला होता शनिवारच्या बंदची प्राथमिक तयारी महाविकास आघाडीने केली असताना मुंबई उच्च न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बंदला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते न्यायालयात त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आली व न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवला न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.


शरद पवार यांनी बदलापूर मधील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन बालकांवर झालेला अत्याचार हा अत्यंत घृणास्पद होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणी ही वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून शनिवारचा बंद मागे घ्यावा असे आवाहन शरद पवार यांनी केले. मात्र त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र राज्यात काळे झेंडे हातात घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून सकाळी 11 वाजता एकत्र येऊन बंदचे आवाहन न करता आंदोलन करू असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते.


महाविकास आघाडीच्या या निर्णयाने नंतर सावंतवाडीतही महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेधाचे बॅनर्स धरून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला.

You cannot copy content of this page