ठाकरे शिवसेनेच्या संजय गवस यांचा शिंदे शिवसेनेला सवाल
⚡दोडामार्ग ता.२०-: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वर असभ्य भाष्य केले होते.. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांच्या वतीने रामदास कदम यांचा निषेध केला होता.त्यावेळी पदाधिकारी व कार्यकत्यांवर गुन्हे दाखल करावे.. यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकणारे शिंदे गटाचे नेते आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात असभ्य बोलणाऱ्या रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आमदार यांच्या मदतीने पोलीस प्रशासनावर दबाव टाकणार का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी विचारला आहे .
विकास कामांच्या नावाने बोंब असून दोन्ही पक्ष एकमेकाची उणीधुणी काढत आहेत.. यांच्या अडीच वर्षाच्या कारभारांंचा विरोधात जनतेमध्ये रोष असून येत्या विधानसभा निवडणुकीत यांना जनताच घरचा रस्ता दाखवेल असा दावाही संजय गवस यांनी केला आहे.
