Headlines

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा सिंधुदुर्ग दौरा…

कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी:शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची केली पाहणी.. ⚡कुडाळ ता.०७-: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ या विशेष अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच…

Read Full News

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई व जलताराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०७-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला.पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी वनराई बंधारे व जलतारा खड्डे मारण्यासाठी शासन स्तरावरून अभियान सुरू करण्यात आली असून गावागावात या अभियानांतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून याच अनुषंगानेग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला….

Read Full News

कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ रोजी डबलबारी सामना

मालवण : (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवानिमित्त कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता २०-२० डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. महेश गावकर आणि मित्रमंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भैराई देवी महिला भजन मंडळ, मोंड गावठणवाडीच्या बुवा सौ. स्वराली नाटेकर (पखवाज-हर्षद मेस्त्री, तबला-दियोग भाटकर) व देव केसरकर हनुमान महिला भजन मंडळ, वर्दे…

Read Full News

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्रमदानातून बंधारा पूर्ण…

मालवण, दि प्रतिनिधी आगामी काळात दुष्काळ व संभाव्य पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावू नये, यासाठी आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून गावातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध…

Read Full News

मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर…

*बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा.. ⚡सिंधुदुर्ग दि.०७-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक कार्यपद्धती तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक पद्धती, मच्छीमारांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी,…

Read Full News

You cannot copy content of this page