Headlines

दांडी येथे ६ ऑगस्ट रोजी नारळ लढवणे स्पर्धा…

⚡मालवण ता.३०-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नारळीपौर्णिमेनिमित्त मालवण दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा रिक्षा स्टँड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम -रु. ६६६६, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रु. ४४४४ देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून पुरविले जातील….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना मिळणार भजन साहित्या ऐवजी अनुदान…

सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांची माहिती.. ⚡कणकवली ता.३०-: जिल्ह्यातील भजनी मंडळांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माध्यमातून मागील वर्षी भजन साहित्य देण्यात आले होते. यावर्षी मात्र या योजनेत बहुतांश बदल करण्यात आले आहेत. यावर्षी पासून भजनी मंडळांना भजन साहित्य किंवा साहित्य दुरुस्त करण्यासाठी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे भजनी मंडळांना साहित्यात…

Read More

रेल्वे कर्मचारी संदीप सरंगले यांचे निधन…!

⚡कणकवली -:शहरातील-परबवाडी येथील रहिवाशी संदीप रमेश सरंगले (४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परबवाडीतील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. संदीप यांचा मनमिळावू व हसतमुख स्वभाव होता. त्यांच्या पश्चता आई, वडील, पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, भावजया, बहीण असा मोठा परिवार आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी सचिन सरंगले यांचे ते चुलत बंधू होत.

Read More

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय ठरल्याने जनतेने त्‍यांना घरी बसवले…

उपरकरांच्या मांडीला मांडी लावून बसता तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली ?:युवमोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा सवाल.. ⚡कणकवली ता.३०-: पालकमंत्री नितेश राणे निष्क्रिय असल्‍याची टीका करणारे सुशांत नाईक, वैभव नाईक यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय ठरल्याने जनतेने त्‍यांना घरी बसवले आहे. तसेच आम्‍हाला नितीमत्तेच्या गोष्‍टी सांगणाऱ्या नाईकांच्या…

Read More

विकास कामासंदर्भात कास ग्रामस्थांनी घेतली संजू परबांची भेट…

विविध कामासंदर्भात वेधले लक्ष: स्थानिक आमदार व निलेश राणेंच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू, संजू परबांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: कास गावातील विकास काम रखडल्यामुळे आज गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट घेत लक्ष वेधले, यावेळी त्यांनी संजू परब यांच्यासोबत गावातील विकास कामासंदर्भात चर्चा केली. दरम्यान आपण या संदर्भात लक्ष देऊन विकास कामांबाबत…

Read More

म्होरक्या आणि दलालांना भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नव्हे…

रुपेश राऊळ: उपरकरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान राखावा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: मोरक्या आणि दलालांना भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नव्हे आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे परशुराम उपरकरांनी नाहक आपल्या पदाधिकाऱ्यांची दिंडोरे काढू नये ,त्यांनी शिवसैनिकांचा मान राखावा असं थेट आवाहन रुपेश राऊळ यांनी केले. दरम्यान शिवसेना ही शिस्त पद्धतीने चालणारा पक्ष त्यामुळे कोणी येऊन…

Read More

ठाकरे शिवसेना महावितरणच्या विरोधात 10 ऑगस्ट व 15 ऑगस्टला महाआरती करणार…

रुपेश रऊळ: पालकमंत्री बैठका घेऊन देखील मात्र प्रश्न सुटत नाही, खासदार स्थानिक आमदार गायब, जनतेने जायचं कोणाकडे..? ⚡सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी तालुक्यात महावितरणच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे दिवसाला दहा ते पंधरा वेळा लाईट जात असताना महावितरण स्मार्ट मीटर कडे जनतेला कुठलीही कल्पना न देता बसवले जात आहेत या सर्व गोष्टीला जनता अक्षरशा कंटाळली आहे महावितरणच्या विरोधात…

Read More

…तर आठ दिवसात पक्षप्रवेश घेऊन दाखवा

महेश सारंग यांचे थेट संजू परबांना आवाहन: तर नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक… ⚡सावंतवाडी ता.३०-:* नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे सर्व जनतेला ठाऊक आहे त्यामुळे संजू परब यांची भाजपवर व जिल्हाध्यक्षांवर बोलण्याची पात्रता नाही ज्या पक्षांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्यावर बोलणं कितपत योग्य असा सवाल करत महेश सारंग यांनी…

Read More

कणकवलीत वृद्धेचा जळून मृत्यू…!

⚡कणकवली ता.२९-: शहरातील कांबळेगल्ली येथील कामत कॉर्नर नजीकच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर भाचीच्या फ्लॅटमध्ये रत्नप्रभा पंडीत ( वय ८५ ) ही वृद्ध महिला गेली वीस वर्ष एकटीच राहत होती. तिचा भाचासंतोष दिनकर सुखटणकर (रा. कणकवली, जळकेवाडी ) हा एम. आर आहे. त्याने त्या फ्लॅट मधील हॉलच्या रुममध्ये व्यवसायासाठी आवश्यक औषधांचे बॉक्स ठेवले होते. त्यामुळे त्याचे अधून…

Read More

नवनिर्वाचित मसदे चुनवरे उपसरपंच वाडकर यांनी घेतली पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची भेट…

विकास कामांबाबत केली चर्चा.. ⚡कणकवली ता.२९-: पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सोबत विकास कामांत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या गावचा विकास करणे हे उद्दीष्ट…

Read More
You cannot copy content of this page