कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी….

विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६ -:* शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा…

Read More

किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने मासेमारी करण्याच्या व्हिडीओला तब्बल १४ लाख व्ह्यूवज…

*💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला-आरवली टांक येथील मच्छीमार युवक किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने नदीतील मासेमारी करण्याच्या व्हिडीओला युट्युबवर सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ लाख व्ह्यूवज मिळाले आहेत. आजच्या आधुनिक व यांत्रिकी मासेमारीच्या काळात लुप्त होत चाललेली पारंपरिक शेंडी पद्धतीने मासेमारी करण्याची पद्धत १४ लाख लोकांपर्यंत पोहचल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात १ जून ते…

Read More

खासकिलवाडा येथील किल्ले स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा आशिष सुभेदार यांच्या हस्ते गौरव…

*💫सावंतवाडी दि.०६-:* खासकिलवाडा प्रभाग क्रमांक ६ येथे लहान मुलांच्या पार पडलेल्या किल्ले स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, युवती अध्यक्ष ललिता नाईक, उपशहराध्यक्ष देवेंद्र कदम, शुभम सावंत आदी उपस्थित होते. पुढील वर्षीही संपूर्ण सावंतवाडी शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा…

Read More

वेंगुर्ला मानसी गार्डन येथील मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारीची सोय करावी….

भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्गच्यावतीने मागणी_ *💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारी यांची सोय करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष अनंत उर्फ दादा केळुसकर यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रकाश सागवेकर, रोहन मोर्जे आदी उपस्थित…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 151 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच १३ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील मुडेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री उत्सव रद्द…

*💫कणकवली दि.०६-:* कणकवली शहरानजीक श्री मुडेश्वर देवस्थान ठिकाणी साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. श्री मुडेश्वर देवस्थान ठिकाणी महाशिरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी महाशिवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मसुरे धरण प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न….

*💫मालवण दि.०६-:* आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त मसुरे देऊळवाडा धरण प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

Read More

अप्पासाहेब पटवर्धन पुण्यतिथी निमित्त गोपुरीत संविता आश्रम तर्फे श्रमदान शिबिर

कणकवली : कोकण गांधी स्वर्गीय अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुण्यतिथीनिमित्त पणदूर येथील सविता आश्रमाच्या वतीने मंगळवार दिनांक 9 व बुधवार दिनांक 10 मार्च रोजी दोन दिवसीय श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमदान शिबिरामध्ये कणकवलीवासी यांचाही सहभाग असणार आहे. अशी माहिती सविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी दिली आहे. सविताश्रमातील सदस्यांच्या वतीने गोपुरी मध्ये श्रमदान…

Read More

मळगाव येथे शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षणास सुरुवात

३ ते १८ वयोगटातील अंगणवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण *💫सावंतवाडी दि.०६सहदेव राऊळ-:* जिल्हा परिषदतर्फे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास मळगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.या सर्वेक्षणात ३ ते १८ वयोगटातील अंगणवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे, स्थलांतरीत होऊन आलेल्या आणि गेलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे व सोशल डिस्टनसिंगचे…

Read More

रोटरी क्लबतर्फे मडुरा हायस्कुलला पुस्तके प्रदान….

*💫बांदा दि.०६-:* न्यू इंग्लिश स्कूल मडुरा शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी रोटरी क्लब पुणे तर्फे समीहन पांगम व भूषण पांगम यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेला पन्नास पुस्तके प्रदान करण्यात आली. हायस्कुलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर समन्वय समिती तथा शालेय समिती सदस्य भिकाजी धुरी, भूषण पांगम, मुख्याध्यापक…

Read More
You cannot copy content of this page