जिल्ह्यात १४ नवीन कोरोना रुग्ण…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 336 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला जिद्दीने सामोरे जावे-:आ. वैभव नाईक…

*कुडाळ येथे बँकिंग करिअर मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन;स्थानीय लोकाधिकार समिती व आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन_ *💫कुडाळ दि.२२-:* सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.अंगणवाडी सेविका पदावर नियुक्त होण्यासाठी स्पर्धा आहे. एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून टिकायचे असेल तरी खडतर परिक्षम श्रम घ्यावे लागतात. राजकारणातही आम्हाला स्पर्धेतून जावे लागते. तशीच स्पर्धा तुमच्या जीवनात आहे. पुढील काळात…

Read More

मालवण पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर बोलविलेल्या बैठकीची तारीख जानेवारीतील !

सरकारी कामगार कार्यालयाचा वेंधळेपणा उघड *💫मालवण दि.२२-:* थकीत वेतनासह आपल्या विविध मागण्यांसाठी मालवण नगर पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगार आणि चालकांनी अलीकडे कामबंद आंदोलन छेडल्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या दखल घेत जिल्ह्याच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कामगार, प्रशासन व ठेकेदार यांची जी निर्णय घेण्यासाठी बैठक बोलाविली आहे त्यासंबंधीच्या पत्रावर बैठकीची तारीख २५ मार्च २०२१…

Read More

शासन नामोल्लेख असलेली पाटी लावत पर्यटक राज्यभर फिरतात…

शासनाने त्यावर कारवाई करावी; सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांची मागणी *💫मालवण दि.२२-:* गाड्यांवर भारत सरकार, राज्य सरकार, पोलीस, आर्मी व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या नावाच्या पाट्या लावून काही हौशी पर्यटक मंडळी आणि कुटुंबातील सदस्य आपली मौजमजा करण्याकरिता अख्खा महाराष्ट्र फिरत असतात. यांवर सरकारी यंत्रणेने त्वरीत लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश…

Read More

राष्ट्रवादी पदवीधर संघाचा कार्यक्रम संपन्न

कुडाळमध्ये जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम *💫सावंतवाडी दि.२२-:* राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर संघाचा कार्यक्रम काल कुडाळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे.यावेळी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग धुरी, पदवीधर संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, काका कुडाळकर, नाझिर शेख, भास्कर परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

नागरिकांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा..

अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे आवाहन;जिल्हा परिषदेत जागतीक जलदिन साजरा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* पाण्याचा बेसुमार वापर टाळणे, वाहते पाणी जमिनीत मुरविणे हाच पाणी बचतीचा मार्ग आहे. याची सुरुवात प्रत्येकांने स्व:ता पासुन करावी, असे प्रतिपादन श्री. राजेद्र म्हापसेकर, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी जागतिक जल दिनांचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या जल पुजन व जल शपत कार्यक्रमांत केले. जागतिक…

Read More

अप्पर जिल्हधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध खनिज उत्खनन

महिन्याला पाच लाखाचा हप्ता सिलिका माफिया देतात; परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप सिंधुदुर्गात अवैध खनिज उत्खनन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरमहा 5 लाख रु हफ्ता महसुल अधिकाऱ्यांना सिलिका माफिया देत असून मोजमापे घेतली तरी आमचे काही बिघडणार नाही अशा बढाया मारत असल्याचेही उपरकर म्हणाले. जिल्ह्यात…

Read More

स्वच्छ्ता शुल्कास भटवाडीचा विरोध…

शुल्क भरणार नाही:नगराध्यक्ष संजू परब यांच्यासाठी निरीक्षक सौ शिरोडकर यांच्याकडे निवेदन. *💫सावंतवाडी दि.२२-:* नगरपालिकेकडून सावंतवाडी शहरातील नागरिकांकडे आकरलेल्या स्वच्छता वापरकर्ता शुल्कास भटवाडी येथील नागरिकांनी विरोध केला असून, आपण हे शुल्क भरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी आज सहाय्यक कार्यालय निरिक्षक सौ. आसावरी शिरोडकर यांच्यामार्फत नगराध्यक्ष संजू परब यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे….

Read More

भाजपा शहराध्यक्ष गोंदावळे यानी पोलिसांना दिल्या खुर्च्या…

पोलिस वर्गात समाधान *💫सावंतवाडी दि.२२-:* सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विनायक शेटकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बाजारात उन्हात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी छत दिले होते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांना बसता यावे यासाठी भाजप शहर अध्यक्ष तथा युवा उद्योजक अजय गोंदावळे यांनी आज खुर्च्या दिल्या आहेत. यावेळी माजी पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवस, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे आदी…

Read More

अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा…

वेंगुर्लेत भाजपाची आंदोलनाद्वारे मागणी *💫वेंगुर्ला दि.२१-:* ठाकरे सरकारमधील अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी आज रविवारी भाजपा च्या वतीने वेंगुर्ले येथे आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत…

Read More
You cannot copy content of this page