जिल्हात आज कोरोनाचे २७ रुग्ण…

एकाचे निधन:२९ रुग्ण कोरोनामुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर २९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. कुडाळ तालुक्यातील येथील 82 वर्षीय पुरुषाचा आज…

Read More

कणकवलीचे माजी मुख्याधिकारी पिंपळे यांचे निधन…

दीर्ध आजाराने हिंदुजा रुग्णालयात आज घेतला अखेरचा श्वास;कणकवली न .प मध्ये दोन वेळा होते सीओ कणकवली : डहाणू नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी तथा कणकवली नगरपंचायत चे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. अतुल पिंपळे यांनी कणकवली नगरपंचायतमध्ये 2 वेळा मुख्याधिकारी पदाचा यशस्वी कारभार सांभाळला होता. कणकवली हुन त्यांची डहाणू नगरपरिषदेत मुख्याधिकारीपदी बदली झाली…

Read More

लसिकरनाची १५ एप्रिल व्यापाऱ्यांसाठी डेडलाइन…

प्रशासनाने सहनशीलतेचा अंत पाहु नये;भाजप प्रवक्ते बाबा मोंडकर यांचा इशारा *💫मालवण दि.२९-:* जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दुकानात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाची १५ एप्रिल पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु कोरोना व्हायरस हा या चाचणी नंतर होणार नाही असे कोणतेही वैद्यकीय प्रमाण…

Read More

बांदा-शिरोडा मार्ग वाहतुकीस धोकादायक!

खड्ड्यांमुळे घडतात अपघात ः प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा आरोप *💫बांदा दि.२९-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली ते शेर्ले दरम्यान खडिकरण व डांबरीकरण येत्या काही दिवसांत होणार असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांना दाखवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. दरम्यान तब्बल दोन वेळा खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी निधी खर्च करण्यात आला. परंतु अद्याप नियोजित रस्त्याच्या कामास सुरूवात न केल्यामुळे ये-जा…

Read More

रान डुक्करासाठी लावलेल्या विजेच्या फासकिने घेतला पिता-पुत्राचा जीव…

आणखी एक गंभीर:कविलकाटे बाव येथील हृदय हेलावणारी घटना:पोलिस घटनास्थळी *💫कुडाळ दि.२९* येथील कविलकाटे बाव परिसरात डुक्करासाठी लावण्यात आलेल्या विजेच्या फासाचा शॉक लागून वडील आणि मुलगा जागीच ठार झाले असून, एकजण गंभीर जख्मी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वडील आणि मुलगा दोघेही शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले असता ही घटना…

Read More

आरएसएसचे जेष्ठ निष्ठावंत यशवंत कोचरेकर यांचे निधन…

मालवण तळाशील येथील कोचरेकर भाऊ नावाने होते परिचीत;जेष्ठ समाजसेवक हरपल्याची व्यक्त होतेय भावना *💫मालवण दि.२९-:* मालवण तालुक्यातील मूळ तळाशील गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत अर्जुन कोचरेकर यांचे निधन झाले. ते सर्वांना भाऊ नावाने परिचित होते. भाऊ यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यशवंत कोचरेकर हे राष्ट्रीय…

Read More

रेकोबा हायस्कूलच्या विद्यार्थिंनींना जनशिक्षण संस्थाकड़ून १० सायकल…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रयत्न;उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांची माहिती *💫मालवण दि.२९-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या प्रयत्नातून जनशिक्षण संस्थेच्या वतीने लुडबे ऐक्यवर्धक मंडळाच्या परिवर्तन केंद्रा मार्फत वायरी येथील रेकोबा हायस्कुल येथे विद्यार्थिनींना १० सायकल देण्यात आल्या. यावेळी जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर, समन्वयक विलासजी हडकर, रेकोबा हायस्कुलचे चेअरमन नगरसेवक आप्पा लुडबे, प्रभारी…

Read More

सावंतवाडी शहरात होळी उत्सव साधेपणाने…

शहरात विविध ठिकाणी होळी : कोरोना महामारीपासून सर्वांचे रक्षण करण्याचे घातले गाऱ्हाणे *💫सावंतवाडी दि.२८ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी होळी सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी होळी पेटवून कोरोना महामारीपासून सर्वांचे रक्षण कर, अशी प्रार्थना करण्यात आली.

Read More

महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची ईडीकडून झडती…

*💫बांदा दि.२८-:* महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची केंद्राच्या अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने आज तब्बल दोन तास झडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. कर्नाटक राज्यातील खाण घोटाळा प्रकरणाशी याचा संबंध असल्याची चर्चा आहे. आज होळी पौर्णिमेच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र झडतीत काय हाती लागले…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोना रुग्ण…

शहरात ५ तर ग्रामीण भागांत ४ *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. या मध्ये शहरात न्यू खासकीलवाडा येथे एक तर सालईवाडा येथे चार रुग्ण सापडले आहेत. तर आजगाव, माजगाव, बांदा.आणि निरवडे या…

Read More
You cannot copy content of this page