Headlines

चिंदर मधील विविध विकास कामांनचा भूमिपूजन सोहळा नम्रता पालकर यांच्या उपस्थितीत संपन्न…

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने आज चिंदर मधील विविध विकास कामांनचा भूमिपूजन सोहळा सरपंच नम्रता महंकाळ- पालकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साटमवाडी पाण्याचा पाट बांधणे 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर कामाचे भूमी पूजन सोसायटी संचालक सुरेश साटम, लब्देवाडी शाळा दुरुस्ती जिल्हा परिषद स्तर कामाचे भूमी पूजन आबा लब्दे यांच्या हस्ते, भटवाडी सार्वजनिक…

Read More

भंडारी प्राथमिक शाळेत भरला आठवडा बाजार…

⚡मालवण ता.२७-: भाजी घ्या… लाडू घ्या… थंडा घ्या… कुरकुरे घ्या… अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करून आपल्या मालाची विक्री करणारे विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक, पालक व ग्राहक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साहपूर्ण वातावरणात आज मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा आठवडा बाजार संपन्न झाला. मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळे मार्फत बाल आनंद…

Read More

पळसंबची श्रुती परब सुवर्णपदकाची मानकरी…

⚡मालवण ता.२७-: मूळ मुंबई येथे राहणारीपळसंब गावठाणची सुकन्या श्रुती संदिप परब हिने राज्य स्तरीय स्पर्धेत ‘किक बाॅक्सिंग फेडरेशन कप ‘ ५० किलो ग्रॅम वजनीय व १८ वर्षे वयोगटीय मुलींच्या संघातुन सुवर्णपदक मिळवले आहे. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बारामती येथे आयोजित ‘किक बाक्सिंग फेडरेशन कप’ स्पर्धेत राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्गाची…

Read More

भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत चौके येथिल रस्ता विकासकामांची भूमिपूजन…

जिल्हा नियोजन मधून कुळकरवाडी- बावखोलवाडी रस्ता खडीकारण डांबरीकरण : ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान.. ⚡मालवण ता.२७-: चौके गावातील चौके- कुळकरवाडी तसेच चौके- बावखोलवाडी या रस्त्यांची भूमिपूजने भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळवारी करण्यात आली. यावेळी चौके माजी सरपंच राजन गावडे, सुरेश चौकेकर,सदाशिव गावडे, दिगंबर…

Read More

मराठी भाषा ही आपली माय…

सुनंदा कांबळे:भंडारी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल मध्ये आज मराठी राजभाषा दिन साजरा.. ⚡मालवण ता.२७-: आपण मराठी भाषिक आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा हि आपली माय आहे. आणि परदेशातून आपल्याकडे आलेली इंग्रजी भाषा हि आपली मावशी बनली आहे. मात्र आज आपण इंग्रजीच्या आहारी गेल्यामुळे वेड्यासारखे इंग्रजी वर प्रेम करू लागलो आहोत. मात्र हा वेडेपणा आपण…

Read More

जीवनात वागण्याचे संस्कार शिकवणारी मराठी भाषा…

राजेंद्र गोसावी:बांदा केंद्र शाळेत मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा.. ⚡बांदा ता.२७-: अमृताते पैजा जिंकू शकणारी अशी मराठी भाषा जीवनात वागण्याचे संस्कार शिकवत असते असे प्रतिपादन साहित्यिक राजेंद्र पांडुरंग गोसावी यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१येथे केले.थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठीभाषा गौरव दिन बांदा केंद्र शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला…

Read More

टीबी मुक्त ग्रामपंचायतसाठी 73 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव…

29 रोजी होणार पडताळणी:जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव यांची माहिती.. ओरोस ता.२७-: शासनाने सुरू केलेल्या टी बी मुक्त ग्रामपंचायत योजनेला पहिल्याच वर्षात चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील ७३ ग्राम पंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून २९ फेब्रुवारी रोजी याची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव यांनी दिली.देशात २०१५ मध्ये…

Read More

जिल्ह्यात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम…

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण ३४ हजार ९०१ लाभार्थ्यांना एकूण ९०७ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८० मोबाईल टीम, ४९ ट्रांसिट टीम द्वारे जोखीमग्रस्त भाग, यात्रा या…

Read More

‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.२७-: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृहिता महिला संस्थेतर्फे रविवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कॅम्प भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सब सदाशिव मंदिरानजिक महिलांसाठी ‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

Read More

मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२७-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमामध्ये प्राथमिक शाळांमधून शाळा मठ नं.२ ने व माध्यमिक शाळांमधून गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडाने प्रथम क्रमांक मिळविला.

Read More
You cannot copy content of this page