Headlines

Global Maharashtra Breaking News

काजू दर निश्चितीसाठी समन्वय समिती स्थापन…

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्ह्यातील काजूला अपेक्षित भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया व्यावसायिक यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत साधक बाधक चर्चा होवून १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समन्वय समितिची पहिली बैठक शुक्रवारी ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँक…

Read Full News

जिल्ह्यात यावर्षी ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी….

सतीश सावंत यांची माहिती सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्ह्यात यावर्षी उच्चाकी भात खरेदी झाली आहे. ८२ हजार २५९ क्विंटल ही खरेदी झाली असून जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल २१ कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी दिली. याबाबत बोलताना बँक अध्यक्ष सावंत यानी, २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ३६ हजार क्विंटल भात खरेदी…

Read Full News

कणकवलीचा आठवडा बाजार बंद…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती *💫कणकवली दि.०५-:* मंगळवारी कणकवलीचा भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने लावता येणार नाहीत….

Read Full News

सतीश सावंत यानी घेतली कोरोना लस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी आज कोरोना लस घेतली. सिंधूदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही लस घेतली. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हीक्टर डांटस उपस्थित होते.

Read Full News

सावंतवाडी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर लाच घेताना कारवाई ?

सावंतवाडी : तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, लाच लुचपत विभागाकडून आज ही कारवाई करण्यात आली आहे. अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read Full News

जिल्ह्यात नवीन ७० कोरोना रुग्ण

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 606 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 675 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 70 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ३३ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

सावंतवाडी नगर पालिका जातीय वाद निर्माण करतेय…

दलित यूथ पॅथर्स प्रदेश अध्यक्ष जाधव यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.०५-:* येथे डिक्री केलेल्या जागेत असलेले इतर गाळ्यांवर कारवाई न करता अनुसूचित जातीच्या असलेल्या रवी जाधव यांच्या गाळ्यांवर कारवाई करत जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सावंतवाडी नगरपालिका प्रशासन करत असल्याचा आरोप दलित युथ पँथर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केला आहे. पालिका प्रशासनाला कारवाई करायचीच…

Read Full News

माड्याचीवाडीतील सद्गुरु भक्तन्यास कोरोना यौद्धाने सन्मानित…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार वेल्फेयरने केला सन्मान *💫कुडाळ,दि०५-:* आंतरराष्ट्रीय मानवअधिकार वेल्फेअर असाेसिएशन या संघटने मार्फत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या संस्थेला *काेराेना याेध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सद्गुरु भक्त सेवान्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यांच्याकडे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी मुंबई समिर परब यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.ही संघटना नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असते.वेळोवेळी समाजात…

Read Full News

आ नाईक यांच्या वाढदिवसाला हजर असणारे काही लोक कोरोना बाधित…

त्यामुळे आ नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करा;मनसेचे पोलिसांना निवेदन *💫कुडाळ दि.०५-:* कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार वैभव नाईक यांनी आपला वाढदिवस साजरा करताना कोरोना नियमांचा विसरले आहेत.कोरोना प्रतिबंधक आवश्यक उपाय अवलंबिन्यात आले नाहीत. कार्यकर्त्यांच्या दाटीवाटीत वाढदिवस साजरा करताना आपल्याच पक्षाच्या पक्षप्रमुख मुख्यमंत्री यांचे आदेश पायदळी तुडविले आहेत.खरंच आहे यात आमदार वैभव नाईक यांची चुक नसुन…

Read Full News

माजी सभापती रविंद्र मडगांवकर यानी घेतली कोरोना लस…

*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी आज सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतली आहे. तसेच यावेळी त्यानी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page