राणेंनी वेळोवेळी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही
*⚡कणकवली ता.२३-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. असा टोला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला…
