Headlines

Global Maharashtra Breaking News

सीमेवरील सैनिक, अन्नदाता बळीराजा, जीवनातील गुरु यांचा आदर बाळगा – प्रा. रुपेश पाटील

⚡सावंतवाडी ता.१२-: :* आपण जीवन जगत असताना आपली रक्षा करणारे सीमेवरील सैनिकांना, जगाचे अन्नदाते अर्थातच शेतकरी बांधव आणि आपल्या जीवनाला विधायक दिशा देणारे आपले गुरु, शिक्षक यांचे ऋण कधीही मिळू शकत नाही, मात्र त्यांच्या प्रती आपण नेहमीच उतरायी होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. मालवण येथील शासकीय…

Read More

कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारीपदी मोहन भोई

⚡कणकवली ता.१२-:वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार पदभार स्वीकारला.यावेळी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.मोहन भोई यांनी वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम करीत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यावेळी गट शिक्षणाधिकारी श्री…

Read More

पालिका निवडणुकीसाठी आमच्याकडे २० उमेदवार…

माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे;वरिष्ठ पातळीवरील जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य सावंतवाडी ता.१२-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या गटाकडे २० हून अधिक उमेदवार आहेत; मात्र वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. यावेळी माजी नगरसेविका आनोरजीन लोबो, प्रकाश बिद्रे अशोक…

Read More

भाजपची लोकप्रियता खुपनाऱ्यांकडूनच ईडी,सीबीआय नावाने ओरड ;ठाकरेंना गद्दरीचे फळ मिळाले

भाजपचे नेते,केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.१२-: ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी,सीबीआय वगैरेच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती ज्यांच्याकडे अवैध होती. वावमार्गाने मिळवली होती.तीच जप्त केली गेली आहे. असेच लोक भाजपविरोधात…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

सावंतवाडी येथे दुपारी ४ वाजता आयोजन;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याच आयोजन सावंतवाडीत करण्यात आले आहे.याबाबतची माहीत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे दिली. दरम्यान या भव्य सत्कार सोहळ्यात सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 62.2 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2378.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 30.8 (2000.5), मालवण- 62.2 (2218.9), सावंतवाडी- 31.4 (2645.4), वेंगुर्ला-…

Read More

सावंतवाडीत टार्जन द वंडर कारची झलक

अचानक सुरू झालेल्या गाडीमुळे नागरिक आश्चर्यचकित ⚡सावंतवाडी ता.१२-: बाजारपेठ येथील पेट्रोल पंप नजिक बाजारात खरेदीसाठी आलेली एक व्यक्ती आपली चार चाकी गाडी पार्क करून गेली होती. परंतु, ती गाडी अचानक सुरू झाल्याने तेथील उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार आज 11 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

गहाळ झालेला मोबाईल पोलिसांनी दिला शोधून…

मोबाईल मालकाने मानले पोलिसांचे आभार ⚡सावंतवाडी ता.११-: गडहिंग्लज ते गोवा या मार्गाने दुधाची गाडी घेऊन जात असताना धवडकी येथे त्या गाडीतील एका व्यक्तीचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबतची माहिती त्या गाडीची चालक धामणकर यांनी दाणोली चेक पोस्ट वरील अंमलदार अजित घाडी यांना दिली. यावेळी त्यांनी स्वतः, प्रविण सापळे, विलास नर,…

Read More

पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना राख्या बांधून युवा फोरम भारत ने साजरा केला रक्षाबंधन सण…

⚡कुडाळ ता.११-: रक्षाबंधन सणांचे औचित्य साधून युवा फोरम भारत संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशन मधील पोलिस बांधवांना तसेच कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला तालुका अध्यक्ष श्वेता बेलेकर, श्रीशा बांदिवडेकर, रुपाली गावकर, संतोषी घाडी, स्नेहल गडकर, सलोनी मोहिते, मृण्मयी मोहिते आदी उपस्थित होते.

Read More

पोलीसांना राख्या बांधून केसरकर समर्थंक महिलांनी साजरा केला रक्षाबंधन सण

⚡सावंतवाडी ता.११-: रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर समर्थक महिला कडून पोलिसांना राखी बांधण्यात आली. रक्षाबंधन हा पवित्र सण कुटुंबीयांसोबत साजरा करणे पोलिसांना शक्य नसल्याने आमदार दिपक केसरकर समर्थक महिलाकडून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भारती मोरे,गीता सुकी, शिवाणी पाटकर, सायली होडावडेकर, पुजा नाईक, भारती परब,सुपिया गावडे, निता सावंत आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page