Headlines

जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथे बाळूमामा देवस्थान कडून सत्कार…

⚡कुडाळ ता.१८-: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रामदास तेंडोलकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच श्री.वरक व श्री.तांडेल यांच्यावतीने त्यांना मानाची घोंगडी देण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

हुमरमळा वालावल येथे जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा सत्कार…

⚡कुडाळ ता.१८-: हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार देवस्थान कमीटीच्या वतीने करण्यात आला. हुमरमळा वालावल गावातील ज्येष्ठ नागरिक त्रिंबक देसाई व श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समिती खजिनदार प्रकाश परब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित…

Read Full News

इन्सुली भिसेवाडीत विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागने काढले सुखरूप बाहेर…

⚡सावंतवाडी ता.१८-: इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इन्सुलीतील अमित धुरी यांच्या मालकीच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या सुमारास…

Read Full News

5 वर्षे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करा…

माजी आ. वैभव नाईक ;आडेली जि. प. सदस्य विजय नाईक यांचा सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: आज आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने विश्वास दर्शवून जी आपल्याला संधी दिली आहे, त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करा. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतला भेटी देऊन गावातील जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते अग्रक्रमाने सोडवा. जि. प. सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीचा उपयोग योग्य प्रकारे करून…

Read Full News

मे २०२७ पर्यंत सावंतवाडी नळपाणी योजनच काम पूर्ण होणार…

नगरसेवक प्रतीक बांदेकर: जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने कुठल्याही प्रकारे राजकारण केले जाणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली नव्या नळपाणी योजनेच्या कामात कुठलेही राजकारण न करता जनतेच्या सुचना ऐकून चांगले काम करण्यासाठी निश्चितच पावले उचलली जातील. येणाऱ्या मे २०२७ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आणून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा देण्यात येईल अशी ग्वाही…

Read Full News

मालवणात ८ मार्च रोजी महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा…

ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल रक्तविरांगना यांचे आयोजन.. ⚡मालवण ता.१७-:ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर -शंकरदास यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन २०२६ – रन फॉर हेल्थ या स्पर्धेचे आयोजन दि. ८ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे….

Read Full News

मालवणात २६ रोजी मराठी शुद्धलेखन स्पर्धा…

⚡मालवण ता.१७-:‘मराठी भाषा दिवस’ उपक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब, मालवण यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक व…

Read Full News

बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय…

⚡मालवण ता.१७-:मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी १७ फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी १० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read Full News

पहिल्या ऊर्जा मित्र बैठकीचे उद्या (१८)आयोजन…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश:वीज ग्राहकांना मांडता येणार आपल्या तक्रारी.. ⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुकास्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड

बांदा/प्रतिनिधीबांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा पक्षीय धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज झालेल्या बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, राजाराम उर्फ बाळू सावंत, तनुजा वराडकर,…

Read Full News

You cannot copy content of this page