Headlines

*२० मे पासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध… ⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पॉलिटेक्निक – डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२६ पासून सुरू होत असून २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सावंतवाडीतील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम…. ⚡सावंतवाडी ता.१९-: विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी भोसले नॉलेज सिटी परिसरात ही स्पर्धा संपन्न होणार असून,…

Read Full News

सावंतवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग…

नगरसेविका दीपाली भालेकर यांची तत्परता. ⚡सावंतवाडी, ता.१९-: सावंतवाडी शहरात मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या सूचनेनुसार भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्येही मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महिला व बाल कल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांनीही विशेष…

Read Full News

रस्ता अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाचे लेखी आश्वासनानंतर मधुकर कुडव यांचे उपोषण मागे…!

⚡बांदा, ता.१९-: इन्सुली कुडवटेंब मुख्य रस्ता ते इसवटी मार्ग या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे मार्ग बंद झाल्याच्या तक्रारीवरून इन्सुली येथील मधुकर कुडव यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा तोडगा निघाला.सदर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत कारवाई व्हावी, या मागणीसाठी मधुकर…

Read Full News

‘एल निनो’च्या सावटाखालील खरीप हंगामासाठी सज्ज व्हा…

मृद व जलसंधारणाचे उपाय योजण्याचे कृषी विभागाचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१९-: जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे आहेत. पॅसिफिक महासागरातील तापमान वाढीमुळे मान्सून कमकुवत होऊन पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाच्या दोन सत्रात मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान कमी राहणे असे परिणाम…

Read Full News

कलमठ गाव अंधारात , वीज अधिका-यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक…

सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सहित ग्रामस्थांचा रात्री 2 वाजेपर्यंत वीज सुरु करण्याचा प्रयत्न ; यापुढे ग्रामस्थांची गैरसोय सहन करणार नाही.. ⚡कणकवली ता.१९-:महावितरण कंपनीकडून सोमवारी वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी महावितरणकडून सकाळी 7.30 वाजता ते सायंकाळी 6 वाजण्याच्या कालावधी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, रात्री…

Read Full News

पंचायत समितीच्या सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ…

लोकांचे प्रश्न मांडायचे कोणाकडे ; सदस्यांचा सवाल :अधिकाऱ्यांच्या अनुपस्थीतीपुढे सभापतीसुद्धा हतबल.. कुडाळ : लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात पाठवले आहे. पण या सभागृहात आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख उपस्थित नसतात. पंचायत समितीच्या या सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ झाला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया सदस्य संतोष कांदळकर यांनी आज झालेल्या कुडाळ पंचायत…

Read Full News

देवगडात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन…

केंद्राच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ आणि टंचाई; सुशांत नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल.. ⚡देवगड,ता.१९-:पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे आणि निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून केंद्र सरकारच्या चुकीच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. देवगड एसटी स्टँडसमोर झालेल्या आंदोलनावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य…

Read Full News

कणकवली शहरात नालेसफाई मोहिमेला वेग…

४० पेक्षा अधिक गटारे आणि नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू.. ⚡कणकवली ता.१९-: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला आहे. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे, दुर्गंधी पसरणे आणि डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, शहरातील ४० पेक्षा अधिक गटारे तसेच मोठ्या नाल्यांची साफसफाई सध्या युद्धपातळीवर…

Read Full News

सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सिंधु मित्र आनंद मेस्त्री व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सामाजिक क्षेत्रामध्ये अविरत निस्वार्थपणे कार्य करणारे सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आनंद मिस्त्री यांचा सत्कार शिवचरित्रकार व अध्यक्ष हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचा सत्कार कीर्तनकार ह.भ.प.श्री विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी महाराज…

Read Full News

You cannot copy content of this page