साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात
आंबोली दि.२६-:* गोव्यातून सांगली येथे होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर आंबोली पोलिसांनी धडक कारवाई केली असून ५४ हजाराच्या दारू सह एकूण ३ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल बुधवारी रात्री ११:३० च्या दरम्यान आंबोली मुख्य धबधब्या जवळ करण्यात आली आहे. या दारू वाहतूक प्रकरणी प्रकाश चव्हाण (२६) आणि अनिल सोलनकर (२३) दोघेही रा. सांगली या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल रात्री पोलिस पेट्रोलिंग करत असताना त्यांना सांगली येथे जाणाऱ्या स्विफ्ट कारचा संशय आल्याने पोलिसांनी ती गाडी तपासणीसाठी थांबवली होती. यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार तेली, पोलिस हवालदार दत्ता देसाई, पोलिस नाईक दिपक शिंदे, पोलिस शिपाई अभिजित कांबळे, राजेश नाईक, संदीप गावडे, होमगार्ड महेंद्र परब यांनी केली आहे.