सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता-:राजन तेली…

⚡सावंतवाडी ता.२५-: जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढवण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता म्हणून माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक संघर्ष करावे लागले परंतु ते कधीच डगमगले नाही आजही त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून जनसेवा अविरत सुरु ठेवली आहे आज त्यांचा वाढदिवस आहे याच निमित्त ग्लोबल महाराष्ट्र चैनल कडून घेण्यात आलेला वाढदिवसानिमित्त धावता आढावा.

एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म घेतलेला माणूसही आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग यशाला गवसणी घालू शकतो हे राजन तेली यांच्याकडे पाहिले की समजून येत. घोडगे सारख्या खेडेगावातून येत महाविद्यालयाच्या जीएस पदापासून त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. महाविद्यालया पासूनच राजन तेली यांच्या नेतृत्वाची व कुशल संघटक म्हणून झलक दिसून आली होती. यानंतर कणकवली शहराचा उपशहरप्रमुख पासून ते थेट विधान परिषद आमदार असा राजन तेली यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. 
१९९५ साली शिवसेना जिल्हाप्रमुख पदी त्यांची थेट निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना नंतर झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत तेली यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत पक्षाची सत्ताही जिल्हा परिषदेवर आणली. साहजिकच पहिल्याच टर्म मध्ये १९९९ साली राजन तेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. दरम्यान कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले. अगदी ठाण्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत धरणांच्या कामाना तेली यांनी गती दिली. जिल्ह्याचा सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदही त्यांनी यशस्वी पणे भूषवले.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात  विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र हताश न होता त्यांनी आपले समाजकारण नेहमीच सुरु ठेवले, कार्यकर्ता कसा जपला पाहीजे हे राजन तेली यांच्याकडून शिकावे, राज्यात सत्ता नसतांनाही मागील अडीज वर्षे ते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहील आंबोली गेळे कबुलायतार गावकर प्रश्नावर त्यांनी नेहमीच आवाज उठविला.

राजन तेली यांचे संघटक म्हणून काम करताना आपल्या कामाकडे त्यांचे नेहमीच घारीसारखे लक्ष असते. जी गोष्ट संघटनेच्या दृष्टीने महत्वाची असते, त्या गोष्टीसाठी त्यांची झेप गरुडासारखी वेगवान आणि कल्पनाही येणार नाही अशी ताकदवान असते. कार्यकर्त्यांना त्याचा अनुभव अनेकदा आला आहे.
प्रशासकीय कामाच्या अनुभवावर आपल्या पक्षाच्या मागण्या ते योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहोचवत आले आहे. जिल्ह्यातील सर्वच छोट्या मोठ्या निवडणुकीत त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नगरपंचायत निवडणुकीत निवगणुक आणि जिल्हा बँक निवडणूकीत देखील समोर असणाऱ्या बलाढ्य महा विकास आघाडीला त्यांनी टक्कर दिली आणि जिल्हा बँकेवर भाजपचे कमळ फुलवल. आजही ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेच्या प्रश्नासाठी अपरात्र झटत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या उमेदवारीसाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहे पक्षाकडून ताकद मिळाल्यास ते निश्चितच यात यशस्वी होतील यात दुमत नाही.

You cannot copy content of this page