मळगाव तेलकाटाडीतील काही भाग गेले चार दिवस अंधारात…

सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील तेलकाटाडीतील काही घरातील वीज पुरवठा गेले चार दिवस खंडित आहे. त्यामुळे येथील लोकांना अंधारात रहावे लागत आहे. तक्रार करूनही गेले चार दिवस याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोक हैराण झाले आहेत.


तेलकाटावाडीत वीज पुरवठ्याच्या दोन लाईन असून एक लाईनचा वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांनी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे

You cannot copy content of this page