बांद्यात आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.२४-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्ही. एन. नाबर मेमोरियल स्कूल बांदाचा रोशन हळदणकर याने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.


खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल चा ओमकार देसाई यांनी द्वितीय क्रमांक तर व्ही. एन. नाबर मेमोरियल स्कुलचा संस्कार शिरोडकर याने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, सहशिक्षक जे. डी. पाटील, रोटरॅक्टचे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, सचिव मिताली सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहावी ते दहावी या गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोटरॅक्टच्या विनिता कुबडे, ईश्वरी कल्याणकर, रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, ओमकार पावसकर, संकेत वेंगुर्लेकर यांनी मेहनत घेतली. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
फोटो :-
बांदा येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page