कणकवली नारळ फाटा येथे बिल्डिंग वरील छप्पर आले कणकवली नरडावे रस्त्यावर…

घटनास्थळी भाजप पदाधिकाऱ्यांची धाव:सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..

कणकवली : तालुक्यात आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ झाले. या वादळात कणकवली नरडवे फाटा नजीक सुरू असलेल्या एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर तब्बल बिल्डिंग वरून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडावे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गेटवर जाऊन पडले. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावेळी घटनास्थळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सुभाष मालंडकर, संजय कामतेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, परशुराम झगडे यांनी धाव घेतली होती. तसेच नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page