वाढदिवसाचे बॅनर लक्षवेधी: निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचाही एक प्रकारे केला निर्धार..
⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महायुतीतील भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यातील वॉर थांबता थांबत नसून, दोघेही एकही संधी सोडत नाही आहेत. यातच माजी आमदार तथा भाजपचे सावंतवाडी मतदार संघ विधानसभा अध्यक्ष राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरत आहेत.
या बॅनर मधून थेट शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्ला करण्यात आला असून, मतदार संघातील विविध विषयांवर लक्ष वेधण्यात आला आहे.

यात दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांचा विकास असेल किंवा अन्य समस्या याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
