कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा मारुती जगताप यांनी स्वीकारला पदभार…

⚡कणकवली ता.२३-: कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी या पोलिस ठाण्यात २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एक महिना कामकाज त्यांनी केले होते. आता ठाणे जिल्ह्यातून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची बदली झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली होती. ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत होते. मात्र त्यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्याने त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार मंगळवारी स्वीकारला आहे.

You cannot copy content of this page