विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढावी यासाठी अनोखा उपक्रम:बजेटबद्दल विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान..
⚡कुडाळ ता.२३-: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट आज संसदेमध्ये मांडलं.. या बजेटबद्दल विद्यार्थाना माहिती व्हावी, विद्यार्थ्यांमधली संशोधन वृत्ती वाढावी यासाठी शिरगावचा पुंडलिक अंबाजी करले महाविद्यालयात हे बजेट सेशन विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांच्या संकल्पनेतून हा ऊपक्रम राबवण्यात आला त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
महाविद्यालयाच्या डिजिटल वर्गांमधून दाखवण्यात आलेल्या बजेट बदल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. सर्व विद्यार्थी बजेटचे थेट प्रक्षेपण सुरू असताना महत्त्वाचे मुद्दे टिपून घेत होते. करले महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राबाबत बजेटमध्ये सांगितलेल्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त केले.. नवीन रोजगार निर्मिती बाबत केलेल्या तरतुदीबाबत विद्यार्थी समाधानी होते. यावेळी प्रा.मयुरी कुंभार, प्रा. सिध्दी कदम, प्रा. सुगंधा पवार, प्रा.कोमल पाटिल, प्रा. ताम्हणेकर, प्रा. सावंत हे उपस्थीत होते.
