वैभववाडी शिवसेनेच्या वतीने एडगाव येथे वाहिली श्रद्धांजली
*💫वैभववाडी दि.२६-:* शहीद साळसकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले.त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही ,त्यांच्या बलिदानाने वैभववाडी तालुक्यातील अनेक तरुण प्रेरणा घेतील,असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. शाहिद विजय साळसकर यांच्या पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,तालुका प्रमुख मंगेश लोके,जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील,माजी जि. पं. सभापती संदेश सावंत पटेल,माजी सभापती रमेश तावडे,लक्ष्मण रावराणे,माजी तालुका अध्यक्ष अशोक रावराणे,शहर प्रमुख प्रदीप रावराणे, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील,व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे सावंत म्हणाले,शाहिद साळसकर यांची प्रेरणा घेऊन तालुक्यातील अनेक तरुण पोलीस व सैन्य दलात जाऊन वैभववाडी तालुक्याचे नावलौकिक करतील अशी आशा व्यक्त केली. स्मारकाची दरवर्षीदोन वेळा शिवसेने मार्फत साफसफाई व रंग रंगोटी केली जाणार आहे.