आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’च्या काव्यलेखन स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद…

*💫बांदा दि.०२-:* ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या सामाजिक संस्थेद्वारे व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून होळी सणाचे औचित्य साधून राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व खुलागट अशा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खुल्या गटातून सर्वोत्कृष्ट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौरी गोसावी यांनी मानांकन मिळविले. माध्यमिक गटात अथर्व जोशी (मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर वैभवी रेडकर (मुंबई) यांनी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळविला. तिन्ही गटातून संप्रवी कशाळीकर, अविनाश ठाकूर, तनवी पाटकर, सुनील मुळीक, मनिषा मालपुरे, अनुराधा उपासे, साहेबराव पवार, वैभव मोरे, सिद्धी सोसे, मधुरा गोंदाणे, लक्ष्मी रेड्डी, श्रेयसी महालकर यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण दीपक पटेकर यांनी केले तर आयोजन राजेंद्र गोसावी आणि मार्गदर्शन दीपक नागरे यांनी केले. आम्ही बालकवी या संस्थेतर्फे लॉकडाऊन काळात नियमितपणे स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये संपूर्ण राज्यातून यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी होतात. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page