युवकांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले..
⚡बांदा ता.०८-: बांदा आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रनजीक रस्त्यावर आढळलेल्या साडेसहा फूट लांबीच्या मगरीला स्थानिक युवकांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहत येऊन ही मगर याठिकाणी आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
ठाकरे शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांच्या दृष्टीस ही मगर पडली. त्यानंतर त्यानी याची कल्पना इतरांना दिली. रियाज खान, साई सावंत, मुरारी सावंत, ओंकार बांदेकर यांनी या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीत मगरिंची संख्या लक्षणीय असून पावसाच्या पाण्याने या मगरी नजिकच्या वस्तीत येत आहेत. त्यामुळे या मगरिंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
