सावंतवाडीतील पत्रकार मित्रांच्या वतीने माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस साजरा…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील नगरपरिषदेचे माजी सभापती, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती लाभली. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, पत्रकार सचिन रेडकर, राजाराम धुरी, विनायक गांवस, प्रा. रूपेश पाटील, रूपेश हिराप, प्रसन्ना गोंदावळे यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

दरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत केक कापून सुधीर आडिवडेकर यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना निरामय, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page