वराडकर हायस्कूल कट्ट्याच्या कु मयुरिका मांजरेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

⚡मालवण ता.०४-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय माध्यमिक ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मयुरिका अमित मांजरेकर हिने तालुकास्तरीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेत ३९ वा क्रमांक पटकाविला

या परीक्षेसाठी तिला प्रशालेचे शिक्षक पी व्ही कानूरकर, सौ एस आर दळवी, के एम हडलगेकर, सौ एस एस चांदरकर सौ व्ही एम शिरोडकर, एस सी पेंडूरकर,ए एस राऊळ, एम व्ही भाट यांचे मार्गदर्शन लाभले कु मयुरिका मांजरेकर हिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक सचिव विजयश्री देसाई, सहसचिव एस डी गावडे, पर्यवेक्षिका सौ डी डी गावडे तसेच संस्था पदाधिकारी व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page