देवगड (प्रतिनिधी)
मिठमुंबरी येथील हितेश नंदकुमार गावकर वय २७ या युवकाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वे रुळावरून उडी मारून आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना रविवारी १६ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मिठमुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकरी यांच्या पत्नी सुषमा नंदकुमार गावकर व त्यांच्या मुलगा हितेश व त्यांचे संपूर्ण कुटुंब सुषमा यांच्या आजार वरिल उपचारासाठी मिठमुंबरी येथून चार दिवसांपूर्वीच मुंबई येथे गेले होते. रविवारी सकाळी दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना छातीत कॅन्सर झाल्याचे निदान केले. याची माहिती सौ सुषमा यांना मिळतात त्यांना त्याचा जबर मानसिक धक्का बसला. यामध्येचं सुषमा यांच्या आकस्मिक निधन झाले. या घटनेचा परिणाम त्यांच्या मुलगा हितेश नंदकुमार गावकर यांच्यावर झाला. त्यानंतर आईची अंत्ययात्रा निघाली परंतु त्या अंत्ययात्रेत हितेश हा उपस्थित नव्हता. अंत्ययातत्रे वेळीचं हितेशने घाटकोपर रेल्वे रुळावरून झोकुन रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक माहिती कुटुंबियांना समजली. या घटनेने गावकर कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे . नंदकुमार व त्यांचे कुटुंबीय सर्व हॉटेल व्यवसाय करतात व आंबा हंगामासाठी गावी मिठमुंबरी येथे येऊन आंब्याचा व्यवसाय करतात. यावेळीही त्यांनी आंबा व्यवसाय करून संपूर्ण कुटुंब मुंबई येथे गेले होते. त्यानंतर आईच्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेले होते. आईच्या विषयी धक्कादायक माहिती समजल्यानंतर हितेश यांच्या मनावर मानसिक आघात झालेले दिसून येते. या घटनेने मिठमुंबरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी, बहिण, भाओजी असा परिवार आहे.