⚡मालवण ता.१३-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका ठाकरे शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे मालवण तालुक्यातील नागरिकांना काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
