वटपौर्णिमे दिवशी वडाचे रोपट्यांचे होणार वितरण…

स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ जिल्हाध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांची माहिती..

⚡कणकवली ता.१३-: स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून या वटपोर्णिमेला 101 रुपये या देणगी मुल्यावर कुंडीतील वडाचे रोपट्याचे मंगळवार १८ जून रोजी वितरण करण्यात येईल,अशी माहिती स्नेह सिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांनी दिली.
पर्यावरण आणि जैवविविधता या दृष्टीने वडाचे महत्वाची पूजा करण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत पूजेचा हेतू असतो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपोर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपला पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाची पूजा म्हणून साजरी करतात. वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची प्रथा भारतीय भारतीय संस्कृतीत आहे.
पर्यावरण आणि जैवविविधता या दृष्टीने वडाचे महत्व आहे. वटवृक्षाप्रमाणे कुंटुंबाचा विस्तार आणि दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना स्त्रिया करतात. वटवृक्ष प्राणी – पक्षांना आश्रय देतो. वड ताशी सातशेबारा किलो प्राणवायू उत्सर्जित करतो. यामुळे वडाचे महत्व अधोरेखित होत आहे. वट पौर्णिमेला या पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडून आणतात. पूजा झाल्यावर या फांद्या कचऱ्यात टाकल्या जातात. सध्या रस्तानिर्मिती, दुरुस्ती यामुळे वटवृक्ष कमी होत आहेत. मोठ्या प्रमाणात फांदी तोड झाली तर या वृक्षाचे अस्तित्व धोक्यात येइल. यासाठी आम्ही “स्नेहसिंधू पदवीधर संचाच्या “माध्यमातून या वटपोर्णिमेला रुपये एकशे एक या देणगी मुल्यावर कुंडीतील वडाचे रोपटे पुरवणार अाहोत.
सात जन्म हाच पती लाभावा, हा यापूजेचा हेतू साध्य होण्यासाठी सात वर्ष या कुंडीतील वट्वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केल्यास स्त्रिया आणि पर्यावरण यांचे नाते घट्ट होईल. सात वर्षानंतर हा वटवृक्ष सार्वजनिक ठिकाणी लावल्यास पर्यावरण संवर्धनही होईल. त्याचप्रमाणे राणे(महाराणा) समाज उन्नत्ती मंडळ,सिंधुदुर्ग या उपक्रमात सहभागी आहेत. राणे समाजाचे कूळ वड असून त्याची तोड न होता, लागवड व्हावी याकरिता स्नेहासिंधू सोबत वडाचे रोप वाटप उपक्रमात सामील आहोत. प्रत्येक मराठी माणसाचे कूळ काही ना काही झाड हे आहेच. प्रत्येकाने अशा रोपांचे संवर्धन केले तरी वृक्ष लागवड वाढेल, हा उद्देश आहे,असे संदीप राणे यांनी सांगितले. ज्या महिलांना वटवृक्षाची कुंडीतील रोपे हवी असतील त्यानी विजयश्री अँग्रो सेंटर (9422435003) यांच्यशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page