व्हॅन-बसमधील अपघातात 4 जण जखमी…

⚡कणकवली ता.०३-: अोरोसहून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला कोल्हापूरहून येणारी इंटरसिटी लक्झरी बसची धडक बसली. या अपघातात व्हॅन चालकासह 4 कर्मचारी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 7 वा. सुमारास फोंड्याघाट येथील मुख्य धबधब्याजवळील तीव्र वळवणावर घडला. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही. मात्र, व्हॅनचे मोठे नुकसान झाले. चालक तृप्ती मुळीक, हवालदार पाडळकर, कदम, निवतकर हे जखमी झाले. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

You cannot copy content of this page