निवती येथे आंबा काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.३०-: वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे आज गुरूवर ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात आली त्यामुळे अनर्थ टळला.
कुडाळ येथील भाई शिरसाठ यांची निवती येथे आंबा कलमांची बाग आहे. या बागेमध्ये 350 आंबा कलम आहेत. तर त्यांच्या बाजूलाच श्री. ठाकूर यांची 200 काजू कलम असलेली बाग आहे. या बागेला आज दुपारी अचानक आग लागली ती विझवण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे अग्निशमन दल पोहचले आणि शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आग विझविली यावेळी वाहन चालक गणेश जाधव, फायरमन नरेश परब, कर्मचारी पंकज पाटणकर, देवेंद्र जाधव सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page