वेंगुर्ले बंदर येथील होडी दुर्घटना प्रकरण उर्वरित दोन्ही खलाशांचेही मृतदेह सापडले…

⚡वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले बंदर येथे होडी उलटून बुडालेल्या चार खलासांपैकी दोन खलाशांचे मृतदेह काल सापडले होते. तर उर्वरित दोन खलाशांचे मृतदेह आज शनिवारी सकाळी सापडले आहे अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून देण्यात आली.


आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आझान मुनिलाल कोल (वय १८) याचा मृतदेह सागरेश्वर समुद्रकिनारी आढळून आला. तर चांद गुलाम महंम्मद (वय १८) याचा मृतदेह सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला नवाबग समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

You cannot copy content of this page