महामार्ग प्राधिकरणाकडे प्रवासी संघाची मागणी..
⚡कणकवली ता.२३-: मुंबई-गोवा माहामार्गवरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे निवेदनाद्वारे महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम झाल्यानंतर या मार्गावर अपघात होण्याचे प्रामण वाढले. जानवली येथील सगल झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. जानवली येथील बुद्ध विहार लगतच्या महामार्गावर गतिरोधक नसणे व दुभाजकामध्ये अनधिकृत ठेवल्याने पदचार्यांचा जीवितास धोका निर्माण झाला आहे. याशिवाय जानवली परिसरात दोन शाळा व एक कॉलेज आहे. महामार्गावरून मुले ये जा करीत असतात. जानवली येथील महामार्गावर होणारे वाढत्या अपघातांमुळे विद्यार्थ्यांचा जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जानवली परिसरातील महामार्गावर अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वेग मार्यादेचे फलक लावणे, गतिरोधक घालणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, लोकवस्ती, शाळा, कॉलेज यांचा उल्लेख दर्शवणारे फलक लावावेत यासह सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. हळवल फाटा येथील वळणावर वारंवार अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे, असे म्हटले.
